ग्रंथसंपदा
कर्मयोगी संन्यासी (मौज प्रकाशन गृह)
स्वामीजींच्या हातून जे घडले होते ते इतिहासाने नोंद घेण्यासारखे होते. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देऊन एका हतबल समाजाला त्यांनी जागे केले होते! जुलूम करणारा मुस्लीम व ज्यांच्यावर जुलूम होत होते ते बहुसंख्य हिंदू असतानाही त्यांनी या संघर्षाला जातीय स्वरूप येऊ दिले नव्हते. गांधीजींच्या मार्गदर्शनानुसार चाललेल्या हैदराबादच्या लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले होते. हैदराबादच्या त्रिभाजनाचा आग्रह धरून नेहरूंसारख्या त्यांच्या ज्येष्ठ स्नेह्याविरुद्ध त्यांनी भूमिका घेतली होती. तेलंगणच्या शेतकऱ्यांचे शोषण आणि कम्युनिस्टांचे हिंसक मार्ग, या दोन्हीविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी जनतेला हिंमत दिली होती. हजारो माणसांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची प्रभा जागृत करणे, हा या संन्याशाचा कर्मयोग होता!
तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ (मौज प्रकाशन गृह)
१८६० ते १९२० या कालखंडात या तीन न्यायमूर्तीच्या आणि गोपाळ कृष्ण गोखल्यांसारख्या अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली जो उदारमतवादाचा प्रयोग झाला तो आज इतिहासजमा होऊ पाहत आहे. लोकशाहीचा आधार असलेला उदारमतवाद आणि त्याची मूल्ये जर आपण आपल्या सार्वजनिक जीवनात आणि आपल्या व्यवस्थेमध्ये पुनःस्थापित करू शकलो तरच आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये आवश्यक तो प्राण निर्माण होईल. अन्यथा तिचा केवळ निर्जीव सांगाडा उरेल. असे न होऊ देण्याची प्रेरणा व्हावी म्हणूनच न्या० महादेव गोविंद रानडे, न्या० काशीनाथ त्रिंबक तेलंग आणि न्या० नारायण गणेश चंदावरकर यांच्या आणि त्या कालखंडात काम करणाऱ्या इतर समविचारी नेत्यांच्या कार्याचे पुण्यस्मरण करण्याचा हा प्रपंच. हा प्रपंच मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या० नरेन्द्र चपळगावकर यांनी इथे साक्षेपाने आणि आत्मीयतेने उभा केला आहे.
Three Judges and Their Times (Lexis Nexis )
This book offers a fascinating account of one of the foundational periods in Indian legal history and of the lives of three truly remarkable judges. All three, Justice Kashinath Trimbak Telang, Justice Mahadev Govind Ranade and Justice Narayan Ganesh Chandavarkar, were outstanding judges of the Bombay High Court in the 19th and early 20th centuries. They functioned in a complex, and at times hostile environment. They cooperated with the authorities and dissented as their consciences dictated. This was the period when British power was at its zenith in India. It was also the time when liberalism emerged as a political philosophy in England and continental Europe and influenced Indians who were getting educated in English and coming to terms with the country’s loss of freedom. This book, an elegant translation from the original Marathi version, presents a vivid account of the close connection between the judicial function and political activity in the period when the three judges lived and worked. It shows how sophisticated and cultured Indians subverted the Macaulean vision of the educated Indian who was supposed to be, ‘Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect’. The author narrates how Telang, Ranade, and Chandavarkar grappled with issues of justice, the interpretation of traditional and colonial law, and good governance. Strikingly relevant for our own times, this book provides a glimpse of how the three helped to evolve genuine and informed public debate in India. Most importantly perhaps the book makes us realize the importance of high personal standards in public life. Readership: All those interested in the development of the Indian legal system including scholars and students of Political Science, Modern Indian History, lawyers and members of the judiciary.
दीपमाळ (जनशक्ती वाचक चळवळ)
महाराष्ट्रातील मराठवाडा अनेक वर्षे निजामाच्या अमलाखाली होता. त्यामुळे येथील सामाजिक, राजकीय परिस्थिती वेगळी राहिली आहे. ठेथिल मुख्य भाषा पूर्वी उर्दू होती. मराठीला फारसे महत्व नव्हते. अशा काळात जे मराठी साहित्य या प्रदेशात लिहिले गेले त्याची ओळख नरेंद्र चपळगावकर यांनी ‘दीपमाळ’मधून करून दिली आहे. महानुभाव पंथातील, संत एकनाथ, रामदास यांच्या परंपरेतील अनेक संत येथे होऊन गेले. हरिगुणकीर्तन, गीता टीका, संतांच्या चारित्र्याचे वर्णन, तसेच गेय असेलली स्फूट रचना ‘पद’ हा वाड्मय प्रकार येथे दिसतो. त्याची ओळख, हिंदी भाषक मराठी संत, मध्वमुनीश्वर, अमृतराय, केशवस्वामी, शिवरायस्वामी, दासगणू, मोगलाईतील मराठी अध्यापक, नांदेडचे काव्यपीठ, पहिले ललित मासिक यांसह मराठवाड्यातील संत लेखक, नाटककार, वृत्तपत्रकार, वाड्मय यांची माहिती यातून मिळते.
तुमच्या माझ्या मनातलं (स्वरूप प्रकाशन)
आजच्या सामाजिक वास्तवातील ढोबळ प्रश्नांची चर्चा राजकीय अंगाने नेहमी केली जाते. या वास्तवाचा भाग असलेले अनेक प्रश्न तुमच्या माझ्या मनात असतात. कुटुंबातील नातेसंबंधाचे, स्वभावातील कंगोऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचे, जीवनात पदोपदी प्रबल शक्तीसमोर असहाय बनणाऱ्या सामान्य माणसाचे हे प्रश्न असतात. समुदायाच्या समाजकारणात अशा प्रश्नांना फारसे महत्त्व मिळत नाही. परंतु त्यांची उत्तरे शोधण्यातच सामान्य माणसांची आयुष्ये खर्ची पडतात. तुमच्या माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांच्याच प्रकाशात या प्रश्नांचा शोध येथे घेतला आहे. या लेखनातील जिव्हाळा, नेमकेपणा व गंभीर विचारातही टिकून राहिलेले लालित्य यामुळे ते अधिक हृदयस्पर्शी झाले आहे.
नामदार-गोखल्यांचा-भारतसेवक-समाज (मौज प्रकाशन गृह)
संस्थेने देऊ केलेले तोकडे निर्वाह वेतन स्वीकारून आयुष्यभर देशसेवा करण्याची प्रतिज्ञा घेणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते निर्माण करणारा ‘भारत सेवक समाज’ ही नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांची देशभक्तीची शाळाच होती. गांधीजी, नेहरू अशांनाही तिचे आकर्षण वाटले होते. शंभरी पूर्ण केलेल्या संस्थेची ही कहाणी…
न्यायाच्या गोष्टी (पद्मगंधा प्रकाशन)
न्यायाच्या या गोष्टी न्यायालयीन खटल्याच्या नेहमीच्या हकिकती नाहीत. रूढ अर्थाने लिहिल्या गेलेल्या त्या न्यायालयीन सत्यकथाही नव्हेत. या कथांचा जन्म मात्र न्यायव्यवस्थेतूनच झाला आहे. न्यायव्यवस्थेत अडकलेल्या आणि न्यायाची अपेक्षा करणान्या पक्षकारांच्या आणि क्वचित न्यायाधीशांच्याही या गोष्टी आहेत. व्यवस्थेचे अपुरेपण अगर तिचा होणारा गैरवापर जसा यात दिसतो तसेच आपले माणूसपण जागे राखणाऱ्या आणि व्यवस्थेपेक्षा न्यायाला महत्त्व देणारांचेही त्यात दर्शन होते. वकील आणि न्यायाधीश म्हणून केलेल्या कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या व समाजजीवनाचा डोळसपणे वेध घेणान्या एका ललित लेखकाचे हे निरीक्षण आहे.
मनातली माणसं (मौज प्रकाशन गृह)
आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणी कायम आपल्या मनात ताज्या असतात. त्यात आई-वडील, कुटुंबीय शिक्षक, स्नेही, मित्र-मैत्रिणी यांचा समावेश असतो. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसांच्या आठवणी ‘मनातली माणसं’ मध्ये शब्दबध्द केल्या आहेत. त्यांची जडणघडण मराठवाड्यात झाली. वडील पुरषोत्तम चपळगावकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, वकिली त्यांनी जवळून पाहिली होती. वडिलांच्या वकिलीचा वारसा त्यांनी पुढे चालविला. वडील, आई यांच्या विषयी तसेच सुधीर रसाळ, मुकुंदराव किर्लोस्कर, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंदतीर्थ, वा. ल. कुलकर्णी असा स्नेही, मित्र, शिक्षक यांच्या विषयी त्यांनी लिहिली आहे. यातून या सर्वांचे व्यक्तिमत्व, त्यांचे लेखकाशी नाते व त्या काळातील समाजदर्शन होते.
महाराष्ट्राचे शिल्पकार अनंत भालेराव (सचिव)
न्या. नरेन्द्र पुरुषोत्तम चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाचे भूतपूर्व न्यायाधीश. समाजेतिहास, मराठी वाङ्मय, कायदा आणि राज्यशास्त्र यांचे अभ्यासक. पुण्याच्या आयएलएस विधि महाविद्यालयात फोर्ड अध्यासनाचे मानद प्राध्यापक व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे गुणश्री प्राध्यापक म्हणून गौरव. ‘कर्मयोगी संन्यासी’ महाराष्ट्र फाऊंडेशनचे पारितोषिक. ‘राज्यघटनेचे अर्धशतक’ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक. ‘विधिमंडळे आणि न्यायसंस्था’ राज्यशासनाचा बॅ. नाथ पै पुरस्कार. ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक. माजलगाव येथे भरलेल्या २६व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – २००४.
त्यांना समजून घेताना (राजहंस प्रकाशन )
स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व करणारी आणि स्वतंत्र भारताचा पाया घालणारी माणसे कर्तृत्वाने जशी मोठी होती, तशी ती मनानेही मोठी होती. त्यांच्यात मतभेद असणे स्वाभाविक होते; पण आपले मतभेद बाजूला सारून देशहितासाठी एकमनाने काम करावे लागेल, याचेही त्यांना भान होते. काळ जसा समजून घ्यावा लागतो, तसेच त्या काळाला कलाटणी देणारी सामर्थ्यशाली माणसेही समजून घ्यावी लागतात. ही एक बौद्धिक आनंद देणारी प्रक्रिया आहे.
साहित्य-आणि-स्वातंत्र्य (राजहंस प्रकाशन)
लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असेल, तरच त्याच्या मनातले लेखनात उतरते. अलीकडील काळात शासनाबरोबरच सामाजिक असहिष्णुतेचे दडपण लेखकावर येऊ लागले आहे. समाजात निर्माण झालेली दहशतीची भावना सामान्य माणसांपेक्षाही प्रतिभावंतांना अधिक जाणवते. मग एक तर ते स्तब्ध होतात किंवा वैचारिक संघर्षाला उभे राहतात. प्रत्येक जण सॉक्रेटिस होऊन शांतपणे विषाचा प्याला पिऊ शकत नसतो. त्याला मग न लिहून शहाणे तरी व्हावे लागते, अगर आपल्या स्वातंत्र्याची बूज राखणारा, त्याचा आदर करणारा उदार समाज अस्तित्वात येईल याची वाट पाहावी लागते. राजकारणातली मंडळींना, ते जाहीरपणे काहीही बोलत असले, तरी निर्भीड नागरिकांचे, लेखकांचे स्वातंत्र्य नकोच असते. साहित्यिक आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करीत असतात. पण मुख्य जबाबदारी असते आपली स्वतःची. आपल्या विचार, लेखन आणि वाचनस्वातंत्र्याचे रक्षण जागरूकपणे आपणच करावयाचे असते. ही जागरूकता जपण्यासाठी विचार करणाऱ्या प्रत्येक सुजाण व्यक्तीने आवर्जून वाचलेच पाहिजे, असे.
संघर्ष आणि शहाणपण (मौज प्रकाशन गृह )
सामाजिक इतिहास, राजकीय इतिहासाइतकाच महत्वाना असतो. तो जोवनाच्या सर्वच अगाना स्पर्श करतो. असा इतिहास घडवताना राजकारणातील धकाधकीपेक्षाही अधिक सासावे लागते. लोकमानसात राजकीय नेते अधिक लोकप्रिय असले तरी समाजकारणातील नते तवढेव मह्त्वाचे असतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासन स्वातंत्रय स्थिर होईपर्यंतची शंभर वर्षे महाराष्ट्राच्या समाजजीवनात खळबळीची आणि जडणघडणीची होती. न्या० महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ना० गोपाळ कृष्ण गोखले, म० सयाजीराव गायकवाड, वि० गो० विजापूरकर, केवलानंद सरस्वती, अशा व्यक्तींच्या कार्याच्या, विस्मृतीत गेलेल्या काही पैलूंबद्दल व मराठी वृत्तपत्रांनी अभिव्यक्ती-स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आणि साने गुरुजीनी केलेली विठोबाची मुक्ती याबद्दलचे या पुस्तकातील लेख; महाराष्ट्राच्या समाजेतिहासातील महत्त्वाचे अध्यायच आहेत.
सावलीचा शोध (मौज प्रकाशन गृह )
‘खिस्ती धर्माच्या आगमनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक जीवनात निर्माण झालेल्या ताणतणावांचे एक वस्तुनिष्ठ, अधिकृत असे दर्शन या पुस्तकातून आपणास घडते. चपळगावकरांची भूमिका या घटनांचे आणि मतांचे मूल्यमापन करण्याची नसून त्यांना जन्म देणाऱ्या परिस्थितीचा शोध घेण्याची आहे. म्हणून त्यांनी या ग्रंथातील लेखनासाठी निवडलेल्या व्यक्तींचे मानस, त्यांना घडवणारी सामाजिक परिस्थिती, त्यांच्या कार्यामागील प्रेरणा, इच्छित कार्य करताना त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या मनात निर्माण झालेले ताणतणाव, त्यांच्या कार्याचे समाजावर होणारे अनुकूल-प्रतिकूल परिणाम-आणि या सर्वांतील नाट्य याचे मनोवेधक चित्र रेखाटण्यात चपळगावकर पूर्णतः यशस्वी झाले आहेत. त्यांची भाषा साधी, सरळ आणि प्रवाही असून ती गरज असेल तेथे चित्रमयी आणि गरज असेल तेथे विवरणात्मक रूप घेते. त्यांच्या भाषेच्या या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे लेखन अतिशय वाचनीय झाले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अभ्यासकांना हे जसे उपयुक्त होणार आहे तसेच ते सामान्य वाचकालाही मनोरंजक वाटणार आहे.’ – डॉ० सुधीर रसाळ (प्रस्तावनेतून)
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर(राजहंस प्रकाशन)
मराठवाड्यातील एका सर्वसामान्य हिंदू कुटुंबात जन्माला आलेली आणि निजामी राज्यात स्वकर्तृत्वाच्या जोरावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदापर्यंत पोचलेली पहिली व्यक्ती म्हणजे केशवराव कोरटकर. त्यांचे हे छोटेसे चरित्र. काशिनाथराव वैद्य या एका निकटवर्तीयाने लिहिलेले. १९३३ साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी प्रसिद्ध केलेले … न्या. कोरटकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोल लक्षात घेऊन मुद्दाम त्या चरित्राची ही नवी संपादित आवृत्ती. नरेन्द्र चपळगावकरांच्या विवेचक प्रस्तावनेसह …
समाज आणि संस्कृती (अनुबंध प्रकाशन)
बकाल होत चाललेली शहरे, अतिक्रमणाचे वाढते विळखे, वाढणारा भ्रष्टाचार, ढासळणारी व्यवस्था, सामान्य माणसाला येणारा असहाय्यतेचा अनुभव आणि त्यामुळे समाजाला आलेली किंवा त्याने पांघरलेली बधीरता हे विषय बहुतेक संवेदनशील माणसाच्या मनात हल्ली जागेच असतात. सामान्य माणूस या प्रश्नांच्या चिंतेने व्यग्र झालेला दिसतो. विखुरलेल्या सामान्य माणसाशी या प्रश्नाबद्दल संवाद करणारे, गंभीर विषयाच्या चर्चेतही आपले लालित्य आणि वाचनीयता कायम राखणारे हे समाजचिंतन आहे.
अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा (ज. रा. वर्दापूरकर)
“श्री. नरेन्द्र चपळगावकर यांचे अन्न-भेसळ प्रतिबंधक कायद्याचे विवेचन करणारे हे छोटेसे पुस्तक अगदी योग्य वेळी प्रसिद्ध होत आहे …. विचारांची स्पष्टता व सुबोधता हे या पुस्तकाचे उल्लेखनीय वैशिष्टय आहे. सरकारी दप्तरात मराठीचा वापर हा एक नवीन बदल आहे व अनेक काययाची मराठी भाषांतरे शब्दजंजाळ व संदिग्धता यांनी ग्रासलेली आहेत. हे पुस्तक या दोन्हींपासून अपवादभूत म्हणून मुक्त आहे. काययाची कलमवार चर्चा करण्याऐवजी विषयवारीने प्रकरणश: चर्चा यात केलेली आहे. ताज्या न्यायालयीन निवाड्यांनी त्याची पाने समृद्ध आहेत. व्यापारी व ग्राहक यांच्यासाठीच विशेषतः हे पुस्तक लिहिले असल्याचा दावा लेखकाने केला असला तरी मला असा विश्वास आहे की लबकरच विद्यार्थी, वकील त न्यायाधीश यांनाही हे पुस्तक अपरिहार्य ठरेल.” (प्रस्तावनेतून) – न्या. व्यं. श्री. देशपांडे मुबई उच्च न्यायालय
कायदा आणि माणूस (प्रतिमा प्रकाशन)
कायदा आणि न्यायव्यवस्था हे समाजजीबनाचे नियंत्रण करणारे महत्त्वाचे घटक. त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. कायदे अमलात का येत नाहीत? पोलीस त्यरेने हालचाल का करीत नाहीत? न्यायव्यवस्थेत इतकी दिरंगाई का ? रुक्ष समजल्या जाणाऱ्या या प्रक्रियेतही मानवी मनाची बेगवेगळी रुपे कशी प्रगट होतात? जीवनव्यबहाराच्या एका महत्त्वाच्या अंगाचा आणि त्यातल्या माणसाचा हा शोध.
विधीमंडळ आणि न्यायव्यवस्था (मौज प्रकाशन गृह)
लोकशाहीतीलसर्वच अंगांना गांधींच्या विश्वस्त भावनेचा अंगीकार करावा लागेल. हे मानावे लागेल, की यांतीलकुठलीही संस्था स्वयंभू, सार्वभौम अगर श्रेष्ठ नाही तर केवळ विश्वस्त आहे. ही जाणीव झाली, की संघर्ष संपतो व त्याची जागा सहजीवन घेते. हे कसे साधता येईलयाचे विवेचन न्या० चपळगावकर यांनी चपखलपणे केले आहे. त्याला त्यांच्या न्यायालयीन व सार्वजनिक कार्याचे भारदस्त अधिष्ठान लाभले आहे. या पुस्तकात ज्याचे विवेचन करण्यात आले आहे, तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे हे तर खरेच आहे; पण लोकशाहीसाठी तो जीवनमरणाचा प्रश्नही आहे. या पुस्तकाचे अध्ययन कायदेमंडळातीलव न्यायव्यवस्थेतीलव्यक्ती यांनी खुल्या अंतःकरणाने करावे एवढीच अपेक्षा आहे. -न्या० चंद्रशेखर धर्माधिकारी
राज्यघटनेचे अर्धशतक (मौज प्रकाशन गृह)
भारताची राज्यघटना कार्यान्वित होऊन पन्नास वर्षे उलटली. या काळात ही घटना कशी राबवली गेली? घटनेने नागरिकांना जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याच्या दिशेने कितपत वाटचाल झाली? नवभारताचे जे चित्र राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांत घटनाकारांनी रेखाटले होते त्या दिशेने आपण पाउले टाकली की विरुद्ध दिशेने? लोकशाही, समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुभाव यांसारख्या घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांशी आपण किती प्रामाणिक राहिलो? या व अशा प्रश्नांची उत्तरे शौंधण्याचा प्रयत्न नरेन्द्र चपळगावकर ‘राज्यघटनेचे अर्धशतक’ मध्ये कळकळीने करतात. नरेंद्र चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठावर न्यायमूर्ती म्हणून काम पाहत होते. घटनेच्या अभ्यासाचा, चिकित्सेचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव इथे प्रत्ययाला येईल आणि सजग नागरिक आणि अभ्यासक यांना तो मोलाचा वाटेल.
Law of Election in India (Shree Books)
Law relating to elections has assumed great importance in our institutional life. This book deals with all important aspects of this branch of law. Electoral Rolls, Qualifications and disqualifications, Reservations, Nominations, Corrupt practices, Election petitions, Counting of votes, Writ Jurisdiction in election matters, Presidential and Vice-Presidential elections, Anti-defection law and Powers of the Election Commission are some of the topics dealt in this book. As the problems and the provisions both are identical in respect of all elections, elections to local bodies like Municipalities, Zilla Parishads, Village Panchayats and that of Co-operative Societies have been considered in this book, besides elections to Central and State Legislatures. Various state laws governing them have been referred to. Table of cases cited has added to the utility. Case law stated is up to January 1985. Author, Shri Narendra Chapalgaonker, is a Senior Advocate of Bombay High Court. He has a distinguished academic career and is well known writer in the field of law and Marathi Literature.
संस्थानी माणसं (मौज प्रकाशन गृह)
इतिहास हा एखाद्या प्रदेशाचा भूतकाळ असतो. तो सांगताना, लिहिताना घटना, क्रमवारी दिली जाते. तसेच इतिहास घडविणाऱ्या व्यक्तीमत्वाचा परिचय करून दिला जातो. नरेंद्र चपळगावकर यांनी अशा ऐतिहासिक माणसांचे चित्रण ‘संस्थांनी माणसं’ मधून केले आहे. हैद्राबाद संस्थानात निजामशाही नांदत होती. त्या काळातील राज्यकर्ते. जहागीरदार न्यायाधीश, अधिकारी, नवाब, तहसीलदार, सल्लागार व सामान्य माणसाचे चित्रण यात केले आहे. आला हजरत उस्मानअली, महाराणा किशनप्रसाद, शामराज बहादूर, रायरायान, न्या. केशवराव कोरटकर, नवाब मेहदी नवज जंग, नवाब अली यावर जंग, सपर वोंल्टर मॉक्टन, आदींची चरित्रातून त्यांचा संघर्ष, नाट्य, इतिहासाला वळण देण्याचा प्रयत्न यांची चर्चा केली आहे.
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी (समकालीन प्रकाशन)
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वं. हे दोघेही एकाच वेळी कार्यरत होते, असा काळ म्हणजे १९१५ ते १९२०. या पाच वर्षांच्या काळात भारतात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मवाळ व जहालांमधील संघर्ष निकाली निघाला; सामाजिक सुधारणांची मागणी ऐरणीवर आली; हिंदू-मुस्लिमांच्या साहचर्याच्या आणि सत्तावाटपाच्या आणाभाका झाल्या. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांविरुद्धच्या लढ्याच्या पद्धतीची पायाभरणी झाली. हे सर्व टिळक आणि गांधी यांच्या साक्षीने व सहभागाने घडून आलं. याच काळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रं टिळकांकडून गांधीरजींच्या हातात गेली. एका अर्थी ती टिळकांनी गांधीजींना सोपवलीही. हे सारं कसं घडत गेलं? टिळक आणि गांधी यांचे स्वातंत्र्यासाठी स्वतंत्रपणे व एकत्र येऊन काय प्रयत्न चालले होते? त्यांच्या सहमतीचे आणि मतभेदाचे मुद्दे कोणते होते? या दोघांचं स्वतंत्र भारताबद्दलचं संकल्पचित्र काय होतं? या व अशा अनेक महत्त्वाच्या मुद््यांचा परामर्श घेणारं आणि दोन महापुरुषांच्या नेतृत्वाची सांधेजोड दर्शवणारं महत्त्वाचं पुस्तक.
मोठी माणसे (मौज प्रकाशन गृह)
पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य यांच्या संधिकाळात आपल्या समाजजीवनावर अनेक व्यक्तींनी प्रभाव टाकला, त्यातील काहींची ही व्यक्तिचित्रे . त्यांची कार्यक्षेत्रे, त्यांचे राजकीय विचार, त्यांच्या कार्यपद्वती आणि त्यांच्या जीवननिष्ठाही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात एक समान सूत्र आहे. त्यांच्या जीवननिष्टेचा एक पदर स्वातंत्र्याच्या चळवळीशी, तर दुसरा समाजाच्या प्रबोधनाशी जोडला गेलेला आहे. या संगळ्या व्यक्तीनी काही शाश्वत मूल्ये आपल्या मनाशी घट्ट बाळगली होती, व्यक्तिगत जीवनातील इच्छा-आकांक्षा आणि गरजा यांना बांध घालून समाजाचे ऋण फेडण्यासाठी, त्याच्या वैचारिक उन्नयनासाठी त्यांनी आपले कष्ट आणि बुद्धी वापरली. अशी असंख्य माणसे त्या काळात होऊन गेली, या पुस्तकातील व्यक्तिचित्रांमध्ये त्या सर्वांचे स्मरण अंतर्भूत आहे. आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण करत असताना या मोठ्या माणसांचे स्मरण नक्कीच प्रस्तूत ठरावे.
महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना (राजहंस प्रकाशन )
भारतात घटनात्मक लोकशाही अस्तित्वात यावी, असा आग्रह करणाऱ्यांपैकी एक महात्मा गांधी प्रमुख होते. राज्यघटना कशी असावी आणि उद्याची समाजव्यवस्था कशी असावी, याबद्दल गांधींची काही मते होते. स्वातंत्र्य लढ्यात गांधींचे नेतृत्व जरी कॉग्रेसने स्वीकारले असले तरी त्यांची राज्यघटनेबद्दलची सर्वच मते काँग्रेसने स्वीकारली नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षात राज्यघटना लिहिली गेली ती गांधीवादी विचारसरणीशी सुसंगत होती, असे दिसत नाही. नरेंद्र चपळगावकर यांनी गांधीजींची विचारसरणी, मुलभूत राष्ट्रीय प्रश्न व भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीविषयीची अभ्यासपूर्ण माहिती ‘महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’ यात दिली आहे.
काशीनाथ त्र्यंबक तेलंग (श्री गंधर्व वेद प्रकाशन)
न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग (१८५०-१८९३) इंग्रजी राजवटीत महाराष्ट्राच्या होणाऱ्या नव्या जडणघडणीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या नेत्यांपैकी काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे एक. अवघ्या ४३ वर्षांच्या आयुष्यात असामान्य बुद्धिमत्ता व परिश्रम यांच्या बळावर त्यांनी विविध क्षेत्रांत महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षणतज्ज्ञ, हिंदू धर्मशास्त्रांचा मूळ संहितांवरून अभ्यास करणारे वकील, रामायण आणि भगवद्गीता यांच्यावर पाश्चा्त्य प्रभावांचा आरोप करणाऱ्या लेखनाचा प्रतिवाद, न्यायव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यातील भारतीयांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी दक्ष असलेला विचारवंत, एतद्देशीय राजकीय अर्थशास्त्राचे एक जनक, हिंदू सामाजिक सुधारणांचा पुरस्कार अवश्य करणारे तरीही सावध पावले उचलण्याचा सल्ला देणारे नेते, असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणारे तेलंग प्राच्यविद्या संशोधक तसेच कायदे पंडितही होते. मुंबई नगरपालिका व पहिले हिंदुस्थानी मुंबई कायदेमंडळ यांचे सभासद म्हणून काम पाहिलेल्या तेलंग यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ही पदेही भूषविली.
आठवणीतले दिवस
(मौज प्रकाशन गृह)
राजकीय आणि सांस्कृतिक असे दुहेरी पारतंत्र्य भोगणाऱ्या मराठवाड्यात नरेन्द्र चपळगावकरांचा जन्म झाला. वडिलांच्या सहभागामुळे स्वातंत्र्यचळवळ आणि राजकारण जवळून पाहता आले. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, मराठी लेखक अणि शिक्षक, वकील, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सार्वजनिक संस्थांचे विश्वस्त, एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनाचे अभ्यासक, स्पष्ट वैचारिक लेखन करणारे लेखक अशा विविध नात्यांनी समाजजीवनाचा दीर्घ पट त्यांनी पाहिला. त्या दिवसांच्या या आठवणी … लेखकाच्या आणि समाजजीवनाच्याही.
हरवलेले स्नेहबंध
परम्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही, हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरड व ठोक सत्य – मनुष्यप्राणी मर्त्य आहे! तरी या स्नेहबंधांच्या स्मृती जिवंत राहतातच. एकीकडे या स्मृतीचा ओलावा डोळ्यांत हलकेच पाणी आणतो, तर दुसरीकडे या स्मृतीच्या उजेडाने जीवन संपन्न झाल्याची जाणीवही समाधान देत राहते. ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांचे लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री.पु. भागवत, बा.भ. बोरकर, य. दि. फडके, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विदा करंदीकर, नरसिह राव, पी.सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किलोंस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतीना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तीचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतीच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह … ‘हरवलेले स्नेहबंध’!
पुस्तके आणि माणसे
कहाणी हैदराबाद लढ्याची

पंतप्रधान नेहरू
(मौज प्रकाशन गृह)

माहितीचा अधिकार
(राळेगण सिद्धी परिवार)

निवडणुकीचा कायदा

Law of Elections

पत्रकारिता : कायदे आणि नीतिमूल्ये
(Developed under DEC development grant )

Mahatma Gandhi and Indian Constitution

भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(दामोदर दिनकर कुलकर्णी )