कायद्याची ‘भाषा’ आणि भाषेचा ‘कायदा’ जाणणारा विचारवंत

                            न्या. मा. नरेन्द्र चपळगावकर

माणुसकी हेच मूल्य प्रमाण मानणारा, संवेदनशील लेखक

                      न्या. मा. नरेन्द्र चपळगावकर

समाजसुधारकांच्या ध्येयवादी परंपरेतील एक अग्रणी

                   न्या. मा. नरेन्द्र चपळगावकर

न्या . नरेन्द्र चपळगावकर

९६व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या नरेन्द्र चपळगावकर यांच्या वाङ्‍मयीन जीवनाचा प्रारंभ ललित वाङ्‍मयाच्या निर्मितीने म्हणजे कविता – कथा लेखनाने झाला. पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी रामानंद तीर्थ आणि पत्रकार अनंत भालेराव यांची चरित्रे आणि महाराष्ट्राच्या समाजजीवनातील महत्त्वाच्या माणसांची व्यक्तिचित्रे लिहिणारे न्या. नरेन्द्र चपळगावकर भारताच्या आणि हैदराबाद संस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. सामाजिक इतिहास, राजकारण, समाजकारण आणि कायदा यासंबंधीच्या तात्त्विक वैचारिक वाङ्‍मयाचा त्यांचा अभ्यास आहे. तर्ककठोर चिकित्सा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणता येते.
मुंबई उच्च न्यायालयातील एक अभ्यासू वकील आणि सुमारे दहा वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेल्या न्या. चपळगावकरांचा मराठवाडा साहित्य परिषदेशी दीर्घकाळाचा संबंध आहे. माजलगाव येथे भरलेल्या सव्वीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर त्यापूर्वी मानवत येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा आणि अलीकडेच नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा त्यांच्या भाषणाने समारोप झाला होता. एकोणिसाव्या शतकातील नागरी समाज घडविणाऱ्या चळवळींचा शोध घेत न्यायमूर्ती महोदव गोविंद रानडे न्या. तेलंग, 

न्या. चंदावरकर, गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांच्या अभ्यासाचे विषय झाले. त्यातून अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची निर्मिती झाली. टिळकांच्या राजकीय जीवनातील स्फोटक भागाऐवजी त्यांच्यातल्या विधायक प्रवृत्तीविषयी लिखाणावर त्यांनी भर दिला. याखेरीज लोकमान्य टिळक आणि म. गांधी यांच्या नेतृत्वाची सांधेजोड स्पष्ट करणारा त्यांचा ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे, तर ‘पंतप्रधान नेहरू’ हे त्यांनी लिहिलेले चरित्रही अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. ‘म. गांधी आणि भारतीय राज्यघटना’ या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजवर त्यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयाबद्दल केलेल्या लेखनातील काही लेख ‘साहित्य आणि स्वातंत्र्य’ या केलेल्या पुस्तकात संग्रहित झाले आहेत. वैचारिक लेखनाबरोबरच त्यांनी कथा, व्यक्तिचित्रे, ललितलेखन यांसारखे अनेक साहित्यप्रकार समर्थपणे हाताळले आहेत. त्यांतील काही महत्त्वाच्या व्यक्तिचित्रांचा समावेश असलेले ‘मनातली माणसं’ हे त्यांचे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. झुंजार पत्रकार अनंतराव भालेराव यांचे ‘अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व’ हे दीर्घचरित्र हा चरित्रलेखनातला मैलाचा दगड मानला जातो.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे गुणश्री प्राध्यापक (Emiritus Professor) म्हणून आणि पुण्याच्या इंडियन लॉ सोयायटीच्या विधी महाविद्यालयात फोर्ड अध्यासनाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. अनेक सांस्कृतिक संस्थांशीही त्यांचा संबंध आहे. ते सध्या नाशिकच्या कुसमाग्रज प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आहेत.
त्यांच्या वैचारिक लेखनाबद्दल श्री. ग. माजगावकर पुरस्कार त्यांना गौरवण्यात आले आहे. तसेच सन २०२२मध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.

चरित्रपट

नरेन्द्र चपळगावकर यांच्या वाङ्‍मयीन जीवनाचा प्रारंभ ललित वाङ्‍मयाच्या निर्मितीने म्हणजे कविता – कथा लेखनाने झाला. कविता, कथा, कादंबऱ्या आणि नाटके यांचे वाचन आणि त्यावर चर्चा हे त्यांचे प्रारंभीचे वाङ्‍मयीन जीवन होते. तारुण्याच्या प्रारंभकाळातच त्यांनी गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि श्री. पु. भागवत यांच्याशी ओळख करून घेतली. पुढे त्यांचा या सर्वांशी स्नेहही जडला. चपळगावकर प्रारंभापासून राजकारणात, सार्वजनिक जीवनात वावरले, तरी त्यांचा कल यासंबंधीच्या तात्त्विक- वैचारिक अभ्यासाकडे नव्हता. वैचारिक वाङ्‍मयापेक्षा त्यांना ललित वाङ्‍मयाचे आकर्षण होते. यासंदर्भात एका मुलाखतीत त्यांनी नमूद केले आहे की, ‘१९५५-५७ हा काळ चांगले वाङ्‍मय काय असते हे कळून घेण्याचा माझा काळ होता. ललितलेखनाची चिकित्सा करावी, ते आपल्याला का आवडले हे तपासावे, त्याचे गुणदोष पाहावे ही प्रक्रिया पुढे म.भि. चिटणीसांच्या आणि नंतरच्या काळात वा.लं.च्या शिकविण्यातून दृढ होत गेली. ‘ नंतरच्या काळात मात्र चपळगावकर यांच्या वाचनाचे केंद्र बदलले. सामाजिक इतिहास, राजकारण, समाजकारण आणि कायदा यासंबंधीच्या तात्त्विक वैचारिक वाङ्‍मयात ते रस घेऊ लागले, तर्ककठोर चिकित्सा करण्यात रमू लागले. हैदराबाद संस्थानाबद्दल, हैदराबाद मुक्तिलढ्याबद्दल महाराष्ट्रात फार मोठे अज्ञान आहे, या जाणिवेतून त्यांनी हैदराबाद मुक्तिलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थांचे चरित्र लिहिले. ते मराठीतल्या उत्तम चरित्रांपैकी एक आहे. 

जे घडले ते सगळे

९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

वर्धा मराठी साहित्य संमेलन येथे न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांचे झालेले भाषण
नरेन्द्र चपळगावकर यांच्या वाङ्‍मयीन जीवनाचा प्रारंभ ललित वाङ्‍मयाच्या निर्मितीने म्हणजे कविता – कथा लेखनाने झाला. कविता, कथा, कादंबऱ्या आणि नाटके यांचे वाचन आणि त्यावर चर्चा हे त्यांचे प्रारंभीचे वाङ्‍मयीन जीवन होते. तारुण्याच्या प्रारंभकाळातच त्यांनी गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि श्री. पु. भागवत यांच्याशी ओळख करून घेतली. पुढे त्यांचा या सर्वांशी स्नेहही जडला. चपळगावकर प्रारंभापासून राजकारणात, सार्वजनिक जीवनात वावरले, तरी त्यांचा कल यासंबंधीच्या तात्त्विक- वैचारिक अभ्यासाकडे नव्हता. वैचारिक वाङ्‍मयापेक्षा त्यांना ललित वाङ्‍मयाचे आकर्षण होते. यासंदर्भात एका मुलाखतीत त्यांनी नमूद केले आहे की, ‘१९५५-५७ हा काळ चांगले वाङ्‍मय काय असते हे कळून घेण्याचा माझा काळ होता. ललितलेखनाची चिकित्सा करावी, ते आपल्याला का आवडले हे तपासावे, त्याचे गुणदोष पाहावे ही प्रक्रिया पुढे म.भि. चिटणीसांच्या आणि नंतरच्या काळात वा.लं.च्या शिकविण्यातून दृढ होत गेली. ‘ नंतरच्या काळात मात्र चपळगावकर यांच्या वाचनाचे केंद्र बदलले. सामाजिक इतिहास, राजकारण, समाजकारण आणि कायदा यासंबंधीच्या तात्त्विक वैचारिक वाङ्‍मयात ते रस घेऊ लागले, तर्ककठोर चिकित्सा करण्यात रमू लागले.

महत्त्वाच्या घटना

बीड येथे जन्म
बीड येथे प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण
एल. एल. बी. आणि एम.ए. (मराठी) पदवी परीक्षांमध्ये पहिला वर्ग
वकिली व्यवसायात पदार्पण
बीड, मुंबई आणि औरंगाबाद येथे २८ वर्षे वकिली
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, मुंबई
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावरून निवृत्त
१० वर्षे मराठवाडा विद्यापीठाच्या विधिसभेचे सदस्य
५ वर्षे राजवाडे संशोधन मंडळ, धुळे याचे अध्यक्ष
हैदराबाद येथील स्वामी रामानंद तीर्थ स्मृती- संशोधन प्रतिष्ठानाचे एक सभासद
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकचे विश्वस्त व नंतर अध्यक्ष
१५ वर्षे प्राज्ञपाठशाळा वाईच्या नियामक मंडळाचे सभासद
‘त्यांना समजून घेताना’ ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
‘कर्मयोगी संन्यासी’ या चरित्र लेखनाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
‘राज्यघटनेचे अर्धशतक’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक
२००५ साली माजलगाव येथे भरलेल्या २६व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
भारतीय जलसंस्कृती मंडळाचे सदस्य
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून गुणश्री प्राध्यापक (Emiritus Professor) म्हणून नियुक्ती
दीड वर्षे इंडियन लॉ सोसायटी विधि महाविद्यालय, पुणे येथे फोर्ड अध्यासनाचे प्राध्यापक
मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेतील संशोधन प्रबंधांचे परीक्षक
पुण्याच्या भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी (Indian School of Political Economy) चा ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ या ग्रंथाला पुरस्कार
श्री. ग. माजगावकर स्मृती वैचारिक लेखनासाठीचा पुरस्कार
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार
२०२३ साली अमेरिकास्थित महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव’ पुरस्कार
२०२३ सालच्या वर्धा येथील ९६ अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष